वसुंधरा संजीवनी मंडळ प्रकल्प भेट रविवार ठाणे - मुरबाड - ठाणे

आपल्या ठाणे जिल्ह्याला पाणी देणारे मुरबाड शहापूर तालुके हे वर्षानुवर्षे तहानलेले आहेत. सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या या परिसरात 10 छोटीमोठी धरणं आहेत. तरीही मुरबाड शहापूरमधल्या तरुणी, आणि बायकांच्या नशिबात डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी वणवण भटकणं होतं. पाण्याविना पीक गेले पिकाविना वित्त गेले वित्ताविना दारिद्र्य आले, दारिद्र्याने विद्या नेली, विद्येविना मती गेली, मतिविना नीती गेली, नीतिविना करंटेपण आले….केवळ पाणी नसल्याने इतके अनर्थ झाले….पण वसुंधरा संजीवनी मंडळाने या दुष्टचक्राला गेल्या 6 वर्षांत या भागाचा अक्षरशः कायापालट केला आहे. दुष्काळी भाग म्हणवल्या जाणाऱ्या प्रदेशात नंदनवन फुलवलं आहे. नापीक जमीन सुपीक होऊन शेतकरी तिबार पिकं घेतोय. तुम्हाला बघायचा आहे हा कायापालट?
चला तर मग, वसुंधरा संजीवनी मंडळाच्या प्रकल्पांना भेट देऊया आणि संजीवनी मिळालेली ठिकाणं आणि माणसं यांना भेटूया….

दि. १२/२/२०२३ व २६/२/२०२३ रोजी मुरबाड येथे वसुंधरा संजीवनी मंडळाचे प्रकल्प बघण्यासाठी जाणार आहोत. इच्छुक असणाऱ्या व्यक्तींनी आपली नावे सोबत दिलेल्याव लिंकवर नोंदवावीत

माहिती:
१) येणारी व्यक्ती स्वतःच्या गाडीने येणार असेल त्यांनी त्याप्रमाणे वसुंधरा संजीवनी मंडळाला सांगावे आणि नियोजित गाडीबरोबर एकत्रित प्रकल्प दर्शन करावे
२) ज्यांची गाडी नसेल त्यांची वाहन व्यवस्था वसुंधरा संजीवनी मंडळ करेल.
३) एक स्वयंसेवी संस्था आपल्या चहा नाश्ता आणि भोजनाची व्यवस्था करत असल्यामुळे आपण प्रत्येकी रुपये 200/- एवढे शुल्क त्यांना द्यावयाचे आहे
४)दि. १२/०२/२०२३ प्रकल्प भेटीसाठी दि. १०/०२/२०२३ पर्यंत नोंदणी करावी
५) दि. २६/०२/२०२३ प्रकल्प भेटीसाठी दि. २४/०२/२०२३ पर्यंत नोंदणी करावी
ठाणे येथून निघण्याची वेळ ठिकाण: सकाळी:६.४५ CADBURY JUNCTION च्या समोर.
परतीचा प्रवास संध्याकाळी ७:०० पर्यंत ठाण्यात पोहोचणार संजीवनी मंडळाला सांगावे आणि नियोजित गाडीबरोबर एकत्रित प्रकल्प दर्शन करावे

REGISTRATION FORM