‘चला जाणूया नदीला’ या अभियानाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा
जिल्ह्यातील नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी
सर्वांनी एकत्र येऊन अभियान राबवूया
– जिल्हाधिकारी अशोक शिनगारे
जिल्ह्यातील नद्या प्रदूषणमुक्त व त्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करु या. नद्या पूर्ववत करण्यासाठी एकत्र काम करायचे आहे. चला जाणूया नदीला अभियानाद्वारे स्वच्छ नदीसाठी होत असलेले काम योग्य दिशेने सुरू असून त्यांचा वेग वाढवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आज येथे दिले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत चला जाणूया नदीला हे अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या अभियानाची आढावा बैठक नियोजन भवन येथे #जिल्हाधिकारी #अशोक_शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपवनसंरक्षक तथा समितीचे सदस्य सचिव संतोष सस्ते, सदस्य उपजिल्हाधिकारी #गोपीनाथ_ठोंबरे, सहायक वनसंरक्षक #गिरिजा_देसाई, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता #श्री_नलावडे, भातसा धरण विभाग क्र.1 चे कार्यकारी अभियंता #योगेश_पाटील, अभियानाच्या समन्वयक जलप्रहरी स्नेहल दोंदे, #वसुंधरा_संजीवनी_मंडळाचे संस्थापक #आनंद_भागवत यांच्यासह नदी पुनरुज्जीवन क्षेत्रात काम करणारे विविध सदस्य यावेळी उपस्थित होते.
जिल्ह्यातील भातसा, उल्हास, #वालधुनी, #कुंभेरी, #कामवारी, #भारंगी, #कनकवीरा, #चोर_नदी, #कुशीवली, लेणाड या नद्यांचा सद्यस्थितीचा आढावा घेऊन जिल्ह्यातील या नद्या प्रदूषण विरहित करण्यासाठी तसेच वाहत्या करण्यासाठी कोणत्या उपाय योजना करता येतील यासंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली.
श्री. शिनगारे म्हणाले की, नद्या प्रदूषण मुक्त व प्रवाही करण्याचे हे काम आपल्या भावीपिढीसाठी करत आहोत. हे अभियान व्यापक स्वरुपात राबविण्यासाठी नागरिकांचाही सहभाग घ्यावा. यासाठी नदी संवाद अभियानाचे आयोजन करावे. तसेच जनसामान्यांना नदी साक्षर करण्याबाबत उपाययोजना आखाव्यात. नदीचे स्वास्थ्य आणि मानवी आरोग्य याबाबत प्रचार व प्रसार करावा.
नद्यांच्या किनाऱ्यावरील उद्योगांकडून होणारे दूषित सांडपाण्याचे व्यवस्थापन करणे व दूषित पाण्याचे स्त्रोत बंद करण्यासाठी कडक उपाय योजावेत. नद्या पुनरुज्जीवन करण्यासाठी काम करणारे जलप्रहरी सदस्य व सेवाभावी संस्था यांना सहकार्य करावे. प्रशासनही नद्यांच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी यावेळी सांगितले.
नदी सुरक्षा समिती स्थापन करून जानेवारीपर्यंत आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
श्री. भागवत यांनी जिल्ह्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी काय करता येईल याबद्दल माहिती दिली व स्वयंसेवी संस्थांचा जास्तीत जास्त सहभाग घेण्यात यावे असे सांगितले.
श्रीमती स्नेहल दोंदे यांनी जिल्ह्यातील नद्यांच्या संदर्भातील सद्यःस्थितीची माहिती दिली. त्या म्हणाल्या की, सर्व मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व कार्यक्रम अधिकारी, स्वयंसेवक, विस्तार शिक्षण विभागाचे विद्यार्थी, आयआयटी मुंबई समन्वयाने उन्नत भारत अभियान अंतर्गत घेतलेली गावे या सर्वांना सर्वेक्षणाचे प्रशिक्षण दिले आहे. नद्यांचे ऐतिहासिक महत्त्व, सामाजिक महत्त्व यांचे मॅपिंग करण्यात येणार आहे. तसेच जैवविविधता व्यवस्थापन समिती आणखी सक्षम करण्यात येणार आहे. वालधुनी नदीचे कॉक्रिटीकरण, कामवारी नदीतील कपड्यांचे प्रदूषण यासह इतर नद्यांतील समस्यांवर चिंतन करून प्रदूषण नियंत्रण मंडळाला आणखी काम करावे लागणार आहे.