देणाऱ्याचे हात हजारो…….

vasundhara

देणाऱ्याचे हात हजारो…….

Published onMay 10, 2023

Vasundhara Sanjivani Mandal

Mission to work for water conservation and management in rural areas

मुरबाड मधल्या यशस्वी प्रकल्पानंतर आता वसुंधरा संजीवनी मंडळाने आपला मोर्चा शहापूरच्या दिशेने वळवला आहे. शहापूर मध्ये सध्या दहा गाव तलावांच्या गाळ उपशाचे काम ‘नाम फाउंडेशन’ च्या सहकार्याने सुरू आहे.

एक चांगलं काम सुरू झालं की त्याला दहा चांगल्या शक्ती येऊन मिळतात आणि त्या कामाचं मूल्य आणि ताकद 100 पटींनी वाढते याचा प्रत्यय आम्हाला शहापूर मध्ये येतो आहे.

केवळ कार्यकर्ते आणि गावकरीच नाही तर शहापूर मधील श्रीक्षेत्र टाकेश्वराचे मठाधिपती परमपूज्य योगी फुलला नाथजी बाबा त्यांच्या सत्संग परिवारासह या संकल्प सहभागी झाले आहेत. शहापूर विधानसभेचे आमदार माननीय दौलतजी दरोडा हे ही या सत्कार यामध्ये नुकतेच जोडले गेले आणि या सगळ्यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागाने जांभे या गावातील नदीपात्रातला गाळ उपसा काल सुरू झाला. या नदीतून गाळ उपसा केल्यानंतर इथे जे पाणी साठणार आहे त्याचा लाभ परिसरातल्या काही शे एकर जमिनीला होणार आहे. त्यातून अर्थव्यवस्था संपूर्णपणे बदलण्याचा मार्ग सापडणार आहे. दुष्काळी भाग म्हणून काहीसे हिणवल्या गेलेल्या या भागाला जल संजीवनी देण्याचं काम वसुंधरा संजीवनी मंडळ विविध संस्थांच्या सहकार्याने करते आहे.

तुम्हीही या कामात सहयोग देऊ इच्छिता का?

तुम्हाला हे प्रकल्प बघायचे आहेत का? तर या खाली दिलेल्या लिंक वर नक्की क्लिक करा आणि मंडळी, कुठलंही काम पैशाशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे आम्हाला तुमच्या आर्थिक मदतीची गरज सदैवच आहे. संपूर्णपणे स्वयंसेवी पद्धतीने काम करणाऱ्या वसुंधरा संजीवनी मंडळाला एक संकल्पचा मेरू (notveryclear) उचलायचा आहे. त्यासाठी तुमची मदत अत्यावश्यक आहे. तेव्हा खाली डोनेशनची जीलिंक दिलेली आहे तिच्यावर नक्की क्लिक करून आपल्याला मिळालेल्यातून गरजूंना देऊन आपण थोडेसे उतराई होऊया…..

More from the blog

‘गाळमुक्त तलाव – गाळयुक्त शिवार’

शहापूर तालुक्यातील कसारा बुद्रुक, शिरोळ, वाशाळा बुद्रुक या ग्रामपंचायतींमध्ये प्रचार रथाच्या माध्यमातून प्रचार – प्रसार करण्यात आला. ‘गाळमुक्त तलाव – गाळयुक्त शिवर’ योजनेच्या माध्यमातून तलावातील

गाळमुक्त धरण व जलयुक्त शिवार

आज शहापूर येथे पंचायत समिती, शहापूर BDO कार्यालय येथे गटविकास अधिकारी(BDO) श्री. भास्कर रेंगडे साहेब यांची भेट घेतली.महाराष्ट्र शासन, ठाणे जिल्हा प्रशासन, भारतीय जैन संघटना(BJS)

दादरवाडी येथील कार्यक्रम

श्री विश्वजीत नाम जोशी, श्री अजित जोशी, व श्री मिलिंद केळकर यांनी दादरवाडी येथील कार्यक्रमाला श्री भागवत काका, सौ कविता, श्री योगेश व श्री विकास