नाम फाउंडेशन व वसुंधरा संजीवनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात होऊ घातलेल्या तलावांचा गाळ उपसा कामांना प्रत्यक्ष सुरुवात झाली.
शहापूर तालुक्यातील टाकीचीवाडी येथे श्री.आनंद भागवत काका( संस्थापक, अध्यक्ष VSM) यांच्या हस्ते श्रीफळ व पुष्पहार अर्पण करून कामास सुरुवात करण्यात आली.
यासमयी गावचे सरपंच तसेच नाम फाउंडेशन कडून श्री.विक्रमजी पाटील, श्री. महेश कदम. VSM कडून श्री.तुंगारे सर, सौ.कविता पडवळ मॅडम, श्री. नितीन खापरे आदी उपस्थित होते.