मुरबाड विधानसभेचे आमदार मा. श्री किसन कथोरे हे तालुक्यातील खेवारे गावामध्ये आले होते. त्यांचे बरोबर काही कार्यकर्तेही होते. गावात आगमन होताच पाझर तलावाच्या ठिकाणी कार्यरत असलेला शाफ्ट प्रकल्प त्यांनी वसुंधरा संजीवनी मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत पाहिला.
डॉ. श्री. सुरोशे व श्री विश्वजीत नामजोशी यांनी यासंबंधीची माहिती थोडक्यात दिली आणि पाणीपुरवठया संबंधीची व्यवस्था कशी आहे हेही सांगितले.
आमदार साहेबांनी ज्या ठिकाणाहून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग होतो तेथे गेट टाकले तर आणखीन पाण्याचा साठा होऊ शकतो असे मत व्यक्त केले.
डॉ. सुरोशे यांचे निवासस्थानी उपस्थित गावकरी व कार्यकर्ते श्री सुरेश बांगर सर, श्री नितीन मोहपे भाजप सचिव, श्री दीपक जी पवार माजी पंचायत समिती अध्यक्ष, यांचे समवेत अनौपचारिक गप्पा झाल्या.
श्री काशिनाथ यांनी खेवारे गावची थोडक्यात परिस्थिती मांडली. त्यानंतर डॉ. सुरोशे यांनी वसुंधरा संजीवनी मंडळ आणि श्री आनंद भागवत काका, श्री विश्वजीत नामजोशी त्याचप्रमाणे श्री केळकर, श्री जोग यांच्या कार्याविषयीचा विशेष उल्लेख करून गावाच्या विकासासाठी हे मंडळ गावकऱ्यांना सोबत घेऊन कशाप्रकारे विकासाचे काम करीत आहे याची माहिती आमदार साहेबांना दिली.
शाफ्ट टेक्नॉलॉजी ने जे काम सुरू झाले आहे त्याचा दुसरा टप्पा म्हणजे गावामध्ये आणखी काही शेततळी निर्माण करणे व ती एकमेकांना जोडणे असा आहे. जेणेकरून सुमारे शंभर एकर जागा ओलीताखाली येईल. यावर उत्तर देताना आमदार साहेब म्हणाले की, खेवारे गावातील शेततळ्यांचा हा प्रकल्प नवीन योजनेमध्ये घेतो. त्याचप्रमाणे सरकारी यंत्रणेमधून जेसीबी किंवा इतर यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. पेंढरी, घोरले, हिरेघर-असोसे, येथील डॅमची मंजुरी झालेली आहे. शिरवली येथील डॅमचे पाणी संपले असल्यामुळे तेथे गाळ काढणे आवश्यक आहे. त्यांनी आपल्याला आणखी एक जबाबदारी दिली आहे ती म्हणजे आपल्या पंचक्रोशीतील गावकऱ्यांना त्यांच्या जमिनी विकून देता कामा नये. आपण त्यांना पाणी उपलब्ध करून देत आहोत त्यामुळे दुबार तिबार पीक काढणे शक्य होणार आहे.
सध्या केंद्र सरकारकडून प्रत्येक शेतकऱ्याला रुपये सहा हजार मिळतात त्याचप्रमाणे नवीन अर्थसंकल्पामधून शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून आणखी सहा हजार रुपये दरवर्षी मिळणार आहेत. त्यामुळे एकंदर रक्कम रुपये १२०००/- होणार आहे.
“नशिबाला एक तरी ७/१२ हवा”असा त्यांनी नारा दिला.
वसुंधराचे कार्यकर्ते, सरपंच गणेश पारधीही याप्रसंगी उपस्थित होते. त्यांच्या कामाचेही आमदार साहेबांनी विशेष कौतुक केले. आंब्याऐवजी इतर फळझाडांची विशेषत: फणस, चिकू यांची लागवड मोठ्या प्रमाणावर करावी असेही त्यांनी सांगितले.
वसुंधराच्या कामाची ही मोठीच पोचपावती आहे. वसुंधराच्या आगामी प्रकल्पांतही आमदार @kisankathore साहेबांचा सक्रिय सहभाग, पाठिंबा आणि मार्गदर्शन मिळत राहिले तर लवकरच शहापूर-मुरबाड तालुके दुष्काळमुक्त होतील ही आम्हाला खात्री आहे.