एकाच क्षेत्रात काम करणारे समविचारी लोक एकत्र आले आणि त्यांच्याकडून काही काम झालं की ते खूप मोठं असतं.
गेल्या तीन महिन्यात #वसुंधरा_संजीवनी_मंडळ आणि #नाम_फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहापूर तालुक्यात जवळजवळ दहा तलावांचा गाळ उपसा करण्यात आला.
कमी कालावधीत खूप मोठ्या कार्याची पूर्तता शहापूर तालुक्यात झाली आहे. सुप्रसिद्ध ‘नाम फाउंडेशनच्या’ सोबत ‘वसुंधरा संजीवनी मंडळाला’ हे काम करताना खूप मनःपूर्वक आनंद आणि अभिमान वाटला.
आज आम्ही पेरलेलं हे बीज आहे. उद्या पावसाळ्यात ते फळणार फुलणार आहे आणि त्या जमलेल्या पाण्याने आजूबाजूच्या लोकांचं आयुष्य सुखी, समृद्ध आणि समाधानी होणार आहे याचा आम्हाला खूप आनंद आहे.
आगामी काळातही नाम फाउंडेशन किंवा पाणी क्षेत्रात काम करणाऱ्या अन्य कुठल्याही संस्थेसोबत वसुंधरा संजीवनी मंडळाला काम करायला निश्चितच आवडेल. “समाज जीवनभरून टाकू चैतन्याने मानाने वैभवशाली भवितव्याला नटवू निज कर्तृत्वाने” या गीताच्या ओळी नसून वसुंधरा संजीवनी मंडळाने ठरवलेले हे ध्येय आहे आणि ते साध्य करण्यात अनेक दिग्गज लोकांची आम्हाला मदत होते आहे. चांगल्या कामाला अनेक हात लागत आहेत ही खूप सकारात्मक बाब आहे.