सकाळी ७ वाजता ठाणे येथून श्री एम व्ही राव ASB International कंपनीच्या संचालकांसोबत वैशाखरे येथे प्रथम वाघाची वाडी येथील चेक डॅम पाहिला.
वाटेत प्रधान पाडा येथील सुरू असलेले काम पाहून
त्यानंतर दादरावाडी येथील नियोजित कामाची साईट पाहुण्यांना दाखवली.
पुढे तळवली येथील तलाव दाखविला. जाताना तळवली येथील चेक डॅम व गॅबियन त्यांनी पाहिले.
खेवारे येथे रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प दाखविला.
श्री राव वसुंधरा संजीवनी मंडळाच्या प्रकल्पाबद्दल समाधानी असून त्यांच्याकडून सामाजिक उत्तरदायित्व निधीची अपेक्षा आहे.
त्यानंतर माळ येथील “अवनी मतिमंद” मुलांच्या शाळेला भेट दिली तेथे दोन बोअरवेल असून एका बोअरवेल च्या जवळ कोणत्याही प्रकारची शेड नाही शाळे नजीकची बोअरवेल बंदिस्त आहे. आणि त्याचा पंप आत पडला आहे. त्यांना माळ ग्रामपंचायत द्वारे जलजीवन मिशन मधून पाण्याची लाईन घेण्याचे सुचविले आहे.
मान्याची वाडी येथील वसुंधरा संजीवनी मंडळाने गाळ काढलेल्या तलावाची पाहणी केली. यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे शेजारील श्री लक्ष्मण यांनी माशांची पैदास केली असून त्यावर ते उदरनिर्वाह चालविणार आहेत. गावचे सरपंच श्री नरेश यांची भेट होऊ शकली नाही. श्री लक्ष्मण व इतर गावकरी यांना पुन्हा एकदा त्या तलावाच्या आत मध्ये उतरून कपडे धुण्यास मनाई करावी आणि तलावातील पाणी बाहेर काढून ते वापरावे असे सुचविले आहे.