केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री नितीनजी गडकरी यांची भेट
आज गुरुवार दिनांक १८/८/२०२२ रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री नितीनजी गडकरी यांची भेट मुंबई येथील वरळी मधील सुखदा या त्यांच्या कार्यालयामध्ये दुपारी दीड वाजता ठरलेली होती.
या भेटीचे आयोजन वसुंधरा संजीवनी मंडळाच्या कार्यकर्त्या सौ स्मिताताई भिडे यांच्या सहकार्याने करण्यात आले होते
या नियोजित भेटीला मुंबईमध्ये वेळेत पोहोचण्यासाठी मी ,श्री अरविंदजी देशमुख, श्री नितीनजी पाटील, श्री भागवत काका व श्री मिलिंदजी केळकर यांचे समवेत सकाळी १०.४५ वाजता ठाणे येथून निघालो आणि वरळी परिसरामध्ये ११.५५ मिनिटांनी पोहोचलो.

येथे पोहोचल्यावर श्री नितीनजी गडकरी यांचे स्वीय सहाय्यक श्री अविनाशजी यांनी आमच्या भेटीसंबंधीचे कारण जाणून घेतले. तसेच चहा व पाणी देऊन आमचे उत्तम स्वागतही केले. वसुंधरा संजीवनी मंडळ ज्याप्रमाणे जलसंधारणाचे काम शहापूर आणि मुरबाड तालुक्यामध्ये करत आहे त्याच पद्धतीचे काम श्री नितीनजी गडकरी हे त्यांच्या एका स्वयंसेवी संस्थेतर्फे अकोला भागामध्येगेली २० वर्षे करीत आहेत. त्यांनी केलेल्या कामाची माहिती पुस्तकाद्वारे दिलेली आहे. ती दोन्ही पुस्तके त्यांनी आम्हाला दिली.

१.४०-१.५५ या कालावधीमध्ये माननीय श्री नितीनजी गडकरी यांच्याशी प्रत्यक्ष मुलाखत झाली. त्यांच्या मार्गदर्शनातून ते असे म्हणाले की सध्या समृद्धी महामार्ग चालू आहे व त्यांच्या मदतीने तलावांचा गाळ उपसा करता येऊ शकतो. कारण त्या तलावातील मुरूम,दगड,गोटे किंवा इतर माती ते महामार्गासाठी नि:शुल्क वापरू शकतात. शिवाय ती माती स्वतःच्या खर्चाने वाहून नेतील.
दुसरा एक मार्ग त्यांनी असा सुचविला आहे की मोठ्या नद्यांमध्ये जेथे पुराची शक्यता आहे अशा ठिकाणी नदी जोडकामासाठी ते पाणी वापरता येऊ शकते.

त्यांनी आपल्या वरील संभाषणामध्ये हे सर्व मुद्दे सांगितलेले आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी दिलेल्या पुस्तकामध्ये समृद्धी महामार्ग आणि जलसंधारण यासंबंधीचे एक परिपत्रक दिलेले आहे. त्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांच्या किंवा सक्षम अधिकाऱ्यांच्या सहयोगाने आपल्याला हे काम करता येऊ शकते. त्यासाठी त्यांनी आपल्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
धन्यवाद
आनंद राऊळ


